धरणगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- धरणगाव शहरातील हनुमान नगरात दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबातील सहा जणांना अश्लिल शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली व घरावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दिपक रतन माळी (वाघ) रा. हनुमान नगर, धरणगाव हे आपल्या परिवारासह राहायला असून ते अंडा पावची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्याच गल्लीत राहणारा यज्ञेश दत्तात्रय पवार याने दिपक माळी यांच्या मुलीला शिवीगाळ केली. तिने हा प्रकार दीपक माळी यांना सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिपक माळी यांच्यासह मुलगी सृष्टी, मुलगा संघर्ष, भाऊ कैलास, वहिणी मंगलाबाई आणि आई रमणबाई महाजन यांना यज्ञेश दत्तात्रय पवार याने व त्याचे नातेवाईकांनी अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. व दिपक माळी यांच्या घरावर दगडफेक केली. या मारहाणीत व दगडफेकीत संघर्ष महाजन आणि रमणबाई महाजन हे जखमी झाले.
त्यांनी दि.२४ सप्टेंबर रविवार रोजी रात्री ११ वाजता याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार फिर्यादीवरून यज्ञेश दत्तात्रय पवार, कन्हैय्या देवा महाजन, योगेश देवा महाजन, समाधान देविदास महाजन, पवन देविदास महाजन, निलेश रावा महाजन, किरण रावा महाजन, विनायक शिवा महाजन, देविदास मांगो महाजन, दत्तात्रय वासूदेव पवार, देवा मांगो महाजन, संजय वासुदेव पवार, सुमनबाई देवा महाजन, पुनम योगेश महाजन, आशाबाई दत्तात्रय पवार सर्व रा. धरणगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.