जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- शहरात एका महिला डॉक्टरला तिच्या ओळखीच्या महिलेने काही गुंडांनकडून धक्काबुक्की करत तिला जिवे मारण्याची धमकी दिली व तिला मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव येथील नामांकित महिला डॉक्टरच्या ओळखीतील अंजोली नारखेडे नावाच्या महिलेने स्वतःच्या फायद्यासाठी महिला डॉक्टरची बदनामी केली. महिला डॉक्टर यांनी बदनामी बाबत दाखल केलेल्या फिर्यादीचा तिने राग मनात धरून ठेवला होता. व बदला घेण्याच्या उद्देशाने तिने काही आरोपींना बरोबर घेऊन हा प्रकार केला.
सदरील डॉक्टर महिला ही त्यांच्या मुली सोबत फुले मार्केट जवळ स्कूटी गाडीवर जात असताना आरोपी अंजोली नारखेडे हिच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी अश्लील व लज्जा उत्पन्न होईल अश्या प्रकारची शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यांनी डॉक्टर महिलेला ‘अंजोलीच्या कोर्ट मॅटरमध्ये पडू नको, अन्यथा तुझा अश्लील व्हिडीओ करू, आणि तुझ्या अंगावर गाडी घालून तुला जीवे मारून टाकू’ अशी धमकी देत उभ्या स्कूटीला लाथ मारून मुलीस खाली पाडण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी दि.२४ रोजी शहर पोलीस स्टेशन येथे अंजली नारखेडे व इतर शिवीगाळ करून बदनामी करणाऱ्या आरोपी व्यक्तींचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.