मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नुकतीच दोन हजार रुपयांच्या नोटा बदलवीण्या बाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषणा केली असून आता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे. आज दिनांक 1 ऑक्टोंबर 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. तर त्या फक्त बँकेत जमा करता येतील बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवून दिलेली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘पैसे काढण्याच्या विशिष्ठ प्रक्रियेचा निर्धारित कालावधी समाप्त झाला असून, पुनरावलोकनाच्या आधारावर, 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलवून घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी आरबीआयने या वर्षी 19 मे रोजी एक परिपत्रक जारी कले होते त्या परिपत्रका नुसार दि.30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलून घेण्यास सांगितले होते. यानंतरच्या कालखंडातही 2000 रुपयांची नोट कायदेशीर राहील असे त्यावेळी सांगण्यात आले होते.
आरबीआयच्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 3 हजार 56 अब्ज रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. 2000 रुपयांची नवीन नोट नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या जागी नव्या स्वरूपातील 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. त्यानंतर मात्र 2018-19 पासून RBI ने 2000 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई थांबवली आहे. तर 2021-22 मध्ये 38 कोटी 2000 रुपयांच्या नोटा नष्ट झाल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या या घोषणेनुसार आता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवून दिल्याने राहिलेल्या नोट धारकांना ही शेवटची संधी आहे