व्हिडिओ पाहण्यासाठी 👆👆 वर क्लिक करा…..
जळगाव/ नेहा वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा या गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे.जळगावपासून ६९ किलोमीटर तर मुक्ताईनगरनगर येथून ११ किलोमीटरवर रुईखेडे गाव वसले आहे.या गावात श्री क्षेत्र शिरसाळे रस्त्यावर संकट मोचक हनुमान मंदिर, नवग्रह मंदिर तसेच ब्रम्हा, साई, विष्णू, लक्ष्मी कुबेर मंदिरही आहे. संकटमोचक हनुमान मंदिर हे खूप जागृत श्रद्धा स्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. मध्यप्रदेशातील भाविकही येथे दर्शनासाठी येत असतात. सण-उत्सवप्रसंगी गावात छोटी जत्राही येथे भरत असते.ऐतिहासिक परंपरा लाभलेले हे टुमदार गाव आहे.
रुईखेडे येथील संकट मोचक हनुमान मंदिर येथे अनेक भक्त मंडळी शंका निवारण आणि विविध समस्या सोडवण्यासाठी येत असतात. श्री बढे महाराज हे भक्तांना मार्गदर्शन करून समस्यांच्या निवारणासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात. मंदिर परिसर विविध पवित्र , आयुर्वेदिक वृक्ष , झाडी वेलींनी सजला असून निसर्ग सौंदर्यही भाविकांना आनंद देऊन जाते.
रुईखेडे गावची लोकसंख्या सुमारे ३,८०० च्या आसपास आहे.
रुईखेडे येथून बोदवड १५ मलकापूर १६ , सावदा २२ ,रावेर ३१ ,तर भुसावळ ३७ किलोमीटर अंतरावर आहे. रुईखेडे येथून प्रसिद्ध श्री क्षेत्र शिरसाळेचा मारोती मंदिर केवळ ७ किलोमीटर असून पक्के रस्ते आहेत.रुईखेडे गाव परिसरात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून अध्यात्मिक वातावरण दिसून येते.