Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजनता शिक्षण मंडळ वर्धापनदिन; आ.चौधरी यांनी दिल्या संस्था परिवाराला शुभेच्छा

जनता शिक्षण मंडळ वर्धापनदिन; आ.चौधरी यांनी दिल्या संस्था परिवाराला शुभेच्छा

फैजपूर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-जनता शिक्षण मंडळ खिरोदा या संस्थेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आज संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी उपस्थित राहून संस्था परिवाराला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या..

ही संस्था केवळ एक शैक्षणिक संस्था नाही तर स्वातंत्र्य आंदोलनातील एक केंद्रस्थान होते. कर्मयोगी धनाजी नाना चौधरी व पू.भाऊसाहेब बोंडे हे या संस्थेचे संस्थापक आहेत‌‌.लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दर्जेदार शिक्षक तयार करणारी संस्था असा नावलौकिक संस्थेने प्राप्त केला आहे.

कार्यक्रमाला डॉ.अरूणा चौधरी,धनंजय चौधरी,संस्था सचिव व साहित्यिक प्रभात चौधरी, उपाध्यक्ष काशिनाथ रामभाऊ चौधरी,अजित पाटील, तुकाराम बोरोले ,उल्हास दयाराम चौधरी उपस्थित होते व सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या