Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावधरणगावहून गोंदियाकडे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८ लाख ३० हजारांचा तांदूळ पकडला

धरणगावहून गोंदियाकडे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८ लाख ३० हजारांचा तांदूळ पकडला

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- दिवसेंदिवस काळाबाजार ,गैरव्यवहार वाढत चालले आहेत.येथून गोंदियाकडे ट्रकमधून काळ्याबाजारात जाणारा आठ लाख ३० हजार ६०२ रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

धरणगावहून गोंदियाकडे ट्रकमध्ये रेशन मालाची वाहतूक होत असल्याची माहिती भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. नशिराबादचे सहायक निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील यांनी नशिराबादपासून ट्रकचा (एमएच १८, बीझेड १०३९) पाठलाग केल्यानंतर काही अंतरावर ट्रक अडविला. त्यावेळी चालकाकडे रेशन मालाच्या वाहतुकीबाबत कुठलीही कागदपत्रे नसल्याने हा ट्रक नशिराबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आला.

नशिराबाद पोलीस ठाण्यात ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात २९ हजार ४९० किलो वजनाचा तांदूळ असल्याचे आढळून आले. बाजारभावानुसार त्याची किंमत आठ लाख ३० हजार ६०२ रुपये आहे. या तांदळासह ४५ लाख रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला. पुरवठा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात येऊन चालक धनराज रामदास सोनवणे (४३), स्वप्नील संजू सोनवणे (२०, रा. भुसावळ), नीलेश वाणी (धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या