Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावडेंग्यू आजाराने पाचोऱ्यातील २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू..!

डेंग्यू आजाराने पाचोऱ्यातील २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू..!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून डेंग्यूने पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाच ते सहा जणांचा या आजाराने बळी गेला आहे. पाचोरातील बाधित उपचार घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीचा शनिवार, 14 रोजी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवसात तब्बल 46 जण डेंग्यूने ग्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे की,चेतना शांताराम पाटील (22) या तरुणीला सुरुवातीला ताप आला. त्यानंतर तिला पाचोरा येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र प्रकृतीत सुधारणा दिसून न आल्याने अधिकच्या उपचारासाठी तिला जळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती अधिक खालावून उपचारात शनिवार, 14 रोजी रात्री तिचा मृत्यू झाला.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्हयात डेंग्यूने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू या आजाराची रूग्णसंख्या वाढत असल्याने सतर्कता घेणे व ताप आल्यास तत्काळ उपचार घेणे याकडे लक्ष देणे रुग्णांसाठी महत्वपूर्ण ठरेल.बारा वर्षाखालील मुलांना डेंग्यूची बाधा सर्वाधिक होत असल्याचे वास्तव समोर आल्याने पालकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

डासांपासून डेंग्यूची उत्पत्ती

डासांमुळे आजाराला निमंत्रण मिळते. यासाठी सकाळी तसेच सायंकाळी डासांच्या उपद्रवापासून सुरक्षित राहण्याची नेहमी काळजी घ्यायला हवी. सर्व शरीर झाकले जाईल, असे कपडे परिधान करणे, मच्छरदाणीचा झोपताना वापर करणे, याबरोबरच साठवण केलेल्या पाण्याचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहेत. शाळेत जाणाऱ्या बालकांना संपूर्ण अंग झाकले जाईल, असा ड्रेस घालावा. आजार होऊच नये, यासाठी काळजी घेणे केव्हाही चांगले असते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या