जामनेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता ते सोडून दिल्याच्या प्रकार १६ ऑक्टोबरच्या रात्री पहर पोलिसांच्या हद्दीत घडला होता. या प्रकरणी पहूरचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे व किरण शिंपी यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच चर्चा होत आहे.
तसेच याबाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी निलंबनाचे आदेश काढले असून, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित चौकशी करीत आहेत. पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे आणि शिंपी यांना मिळाली होती. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी एक वाहन पकडले; परंतू वाहनावर कारवाई न करता ते सो देण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यावर तसा अहवाल पहूर पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षकांकडे पाठवला आहे.