Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावअमळनेर एसटी बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे विद्यार्थी वृद्ध महिला व कामगार प्रवासी...

अमळनेर एसटी बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे विद्यार्थी वृद्ध महिला व कामगार प्रवासी यांना होतोय त्रास

अमळनेर एसटी डेपो चा मनमानी कारभार

अमळनेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अमळनेर तालुक्यातील एसटी बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे विद्यार्थी वृद्ध महिला व कामगार प्रवाश्यांना काही दिवसांपासून खूप त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्यामुळे कॉलेज, शाळा तसेच क्लासेसला उपस्थित राहत येत नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे. तसेच बरेचसे कामगार बसेसने अप डाऊन करीत असतात त्यांना कामावर वेळेवर उपस्थित राहता येत नसल्यामुळे त्यांच्या रोजगार वर मोठा परिणाम होत आहे.

थांबा असूनही एस टी बस थांबत नाही थांब्यावर

याबाबत प्रताप कॉलेज चे धाड, मारवाड, डांगरी, कळमसरे व इतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी बस ड्रायव्हर प्रताप कॉलेज बस थांबा असूनही त्या बस थांबकावर गाडी थांबवत नाही.वास्तविक हा बस थांबा एस टी महामंडळानेच निर्धारित केला आहे. सायंकाळची 5.15 ची बस या बस थांब्यावर थांबत नसल्याने कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना कॉलेज ते बस स्टॅन्ड पर्यंत पायी चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना घरी पोहचेपर्यंत रात्र होते.

आगार प्रमुख यांनी दिले आश्वासन

या बाबतची तक्रार मनसे तालुका प्रमुख संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी या तक्रारीची लगेच दखल घेत आगर प्रमुखांना याबाबत विचारणा केली.याला आगर प्रमुखांनी गांभीर्याने घेत सूचना केल्या व ज्या बस ड्रायव्हरने बस थांब्यावर गाडी थांबवली नाही त्या गाडीचा नंबर घेऊन आगाराकडे तक्रार करू शकता. व यापुढील सर्व गाड्या वेळेवर लावण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले .

निवेदेन देताना उपस्थित

आगार प्रमुखांना निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष संदिप पाटील (काटे ),शहर अध्यक्ष धनजय धनंजय साळुंखे, राकेश भाऊ दाभाडे, शहर सचिव संकेत पाटील, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शहर उपाध्यक्ष गजानन गोसावी, सुनील पाटील, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष राहुल शेलकर, व मनसे सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या