पिंपरी चिंचवड / तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमीन खरेदी प्रकरणात यापूर्वी अनेकांना करोडो रुपयांत फसविले गेल्याची घटना या घडल्या आहेत.जमिनी तसेच फ्लॅटवर अनधिकृतपणे ताबा मारून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत धुमाकूळ घालणाऱ्या चिंचवडच्या महिलेस तडीपार करण्यात आले आहे.यासोबतच एका पुरुष आरोपीलाही तडीपार केले आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले.परिणामी या घटनेने खळबळ माजली आहे.
भारती निंबा भारंबे (५५) आणि मल्लीनाथ भीमाशंकर नोल्ला (६०, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालवधीसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली.या कारवाईची पिंप्री, चिंचवड आणि पुण्यातील काही भागात चर्चा मोठया प्रमाणात झाली.हा विषय खूप मोठा असून या प्रकरणी अजून माहिती लवकरच हाती येईल असे सूत्रांनी सांगितले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात घरांना मोठी मागणी आहे. त्यामुळे घर तसेच जागांना सोन्याचे भाव आहेत.अनेकांचे घर हे स्वप्न असते.अनेक इच्छुक घर अथवा फ्लॅट घेण्यासाठी तयार असतात.कर्ज काढत असतात ,गावाकडची शेती व इतर प्रॉपर्टी विकत असतात, याचाच गैरफायदा घेत दोघांनी मिळकतींचे व्यवहार करत काही जणांची फसवणूक केली.अनेक गरीब-सामान्य कुटुंबातील लोक यात फसले.मोठ्या कष्टाने त्यांनी पुंजी जमा केली होती ,अशी माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडे काही तक्रारी आल्या.त्यामुळे पोलिसांनी या गैरप्रकाराचा शोध घेतला, त्यानुसार गुन्हे दाखल आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिनिधीस दिली आहे ,दरम्यान महिला आरोपी ही खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील असल्याने चर्चा रंगू लागली आहे.
पुढे काय काय होते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.