Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगावातील १४ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर; ६७ महसूली मंडळांचा समावेश

जळगावातील १४ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर; ६७ महसूली मंडळांचा समावेश

जळगाव- पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून यात ६७ महसूली मंडळाचा समावेश आहे. या महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू करण्यात येणार आहेत. अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

दि.९ गुरुवार रोजी मंत्रालयातील वॉर रूम येथे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकी मध्ये मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिववि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून या मध्ये,

जळगाव:- जळगाव तालुक्यातील जळगाव, भोकर, म्हसावद, नशिराबाद, असोदा, पिंप्राळा.

जामनेर:- तालुका जामनेर महसूली मंडळामध्ये जामनेर, पहुर, शेंदुर्णी, वाकडी, मालदाभाडी, नेरी, तोंडापूर.

एरंडोल:- एंरडोल मध्ये एरंडोल, उमरदे (रिंगणगाव), कासोदा, उत्राण.

धरणगाव:- धरणगाव, सोनवंद, पाळधी, पिंपरी खुर्द, साळवा, तर
नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये, चांदसर

भुसावळ:- भुसावळ, वरणगाव, कु-हे प्र.नृ, पिंपळगाव.

बोदवड;- बोदवड, करंजी.

यावल:-भालोद, किनगाव, साकळी,
फैजपूर:- फैजपूर, बामणोद.

रावेर;- खिर्डी, निभोंरा बुद्रुक.

मुक्ताईनगर:- मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव.

पाचोरा:- पाचोरा, नगरदेवळा, गाळण, पिंपळगाव हरेश्वर, कु-हाड, वरखेड बुद्रूक.

भडगांव:- भडगांव, कांजगाव (गोंडगाव), आमडदे, कोळगाव.

अमळनेर:- अमळनेर, पातोंडा, भरवस, मारवड, अंमळगाव, शिरूड, वावडे.

चोपाडा:- चोपडा, आडावद, गोरगावल बु, चाहाडा, धानोरा प्र.य., लासुर.

पारोळा:- बहादरपुर, घोरवड, शेवाळे बुद्रुक.

वरील सर्व महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता राहिलेल्या उर्वरीत दुष्काळसदृश्य भागांसाठीही निर्णय घेण्यात येईल असे पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या