सावदा/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- सावदा येथे लेवा पाटील समाजातील उपवर मुला -मुलींच्या परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा दिवाळीच्या सुटीचे औचित्य साधून आयोजित केला गेला असून खास करून सुटी दरम्यान गावाकडे आलेल्या समाज बांधवांसाठी या मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. या मेळाव्याला दि.११ शनिवार रोजी सकाळी ९ वाजता सावदा पालिकेच्या स्व.प्रभाकर बुला महाजन सामाजिक सभागृहात सुरुवात होईल. हा मेळावा समाजातील उपवर मुला-मुलींच्या व पालकांच्या मागणीनुसार आयोजित केला असून होणाऱ्या मेळाव्याला सर्व समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन लेवा शुभमंगल संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मेळावा आयोजनाचा मुख्य उद्देश
आयोजित सकल लेवा शुभमंगल मेळावा हा मुला मुलींच्या पालकांच्या कामांच्या व्यस्ततेचा विचार करून ठेवण्यात आला आहे. विविध अडचणींमुळे विवाह करताना येणारे अडथळे दूर व्हावे व विवाह लवकर आणि योग्य वेळेत तसेच योग्य जोडीदारासोबतच जुळावे…. या साठीचा हा प्रयत्न आहे. यासाठी खास करून दिवाळीच्या सुट्ट्यांचे निमित्त साधून, गावाकडील नोकरी, व्यवसाय , शिक्षण करणारे मुलं-मुली आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विविध शहरांमधून सुट्यांनिमित्त गावाकडे येणाऱ्या समाज बांधवांसाठी या मेळाव्याचे मुख्य आयोजन केले गेले आहे. याचा मुख्य उद्देश समाजातील सर्वांना एकत्रित आणण्याचा आणि विवाह जुळवुन आणण्याचा आहे.
मेळाव्याचे ठिकाण व रूपरेषा
दि. ११ नोव्हेंबर शनिवार रोजी मेळावा स्व. प्रभाकर बुला महाजन हॉल , बस स्टँड मागे , सावदा येथे होत असून, मेळाव्याला सकाळी 9 ला सुरुवात होईल. मेळाव्या दरम्यान दुपारी 1 ते 1:30 वेळेत जेवणाचा कार्यक्रम होईल.त्यानंतर उर्वरित कार्यक्रम पार पडेल अशी माहिती संस्थे मार्फत देण्यात आली आहे
लेवा शुभमंगल संस्थेतर्फे आवाहन
शनिवार दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ पासून ते कार्यक्रम संपेपर्यंत या दिवशी भव्य असा वधु-वर परिचय मेळावा होणार असून त्यामध्ये वधू वरांची प्रत्यक्ष भेट व्हावी यासाठी संबंधित वधु-वर आणि त्यांच्या पालकांनी मेळाव्याला येण्याचे आवाहन लेवा शुभमंगल तर्फे करण्यात आले आहे.
मेळाव्याचे ठिकाण सावदा
मेळाव्याचे ठिकाण सावदा हे शहर समाजाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जळगाव , भुसावळ , यावल , चोपडा , ब-हाणपूर , हैदरपूर , डाभियाखेडा , भिकनगांव-सायखेडी , खरगोन , मलकपूर, धरणगांव , मुक्ताईनगर वरणगांव, दाताळा , मोताळा , बुलढाणा थोरगव्हाण , गाडेगाव, भुसावळ, या कोणत्याही ठिकाणाहून मध्यवर्ती ठिकाण असून यादरम्यान दीड ते दोन तासाचा प्रवास आहे.
अधिक माहितीसाठी 9420309965 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लेवा शुभमंगल संस्थेमार्फत करण्यात आले आहे.