Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळच्या रेल्वे परिसरात दोन जणांकडून जप्त केले गावठी पिस्टल व पाच जिवंत...

भुसावळच्या रेल्वे परिसरात दोन जणांकडून जप्त केले गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुस..!

भुसावळ/प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी गावठी पिस्टल नेहमीच आढळून येत असतांत.पोलीस निष्क्रियतेने कार्य करीत असल्याबद्दल नाराजीचा सूर निघत आहे.

आता भुसावळ शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.दरम्यान या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.रेल्वे स्थानकाच्या केला सायडींगजवळ ही कारवाई गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. योगेश महेश वंजारे (बौद्ध विहार, खडका, ता. भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (वीटभट्टी ताजी, धुळे, ह.मु. खड़का सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर झायलो मालक विलास सपकाळे (शांती नगर, भुसावळ) हे पसार आहेत.तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, भुसावळ शहराचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. रेल्वे केला सायडींगजवळ गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयित झायलो (एम. एच.१९ बी. जे. ८१९९) मधून आल्यानंतर त्यांना पोलिसांना अडवत वाहनातील दोघा संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून कट्टा तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले. एक गावठी बनावटीचा कट्टा त्याचा बॅरल १६.५ सेमी लांबीचा त्यास पकडण्यास प्लॅस्टीकचे काळे आच्छादन असलेली मुठ, त्यावर दोन्ही बाजुस लाल रंगाचे स्टार कव्हर असलेला आणि लोखडी बॉडी असलेला मॅगझीनसह अंदाजे पंधरा हजार किंमतीचे पाच जिवंत राउंड प्रत्येकी ०२.५ सेमी लांबीचे पितळी बॉडी असलेले त्याच्या पाठीमागे इंग्रजीमध्ये के. एफ ७६५ असे उमटवलेले एक महिंद्रा झायलो मॉडेलची पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन जप्त केली आहे. भुसावळ शहर आधीच गुन्हेगारी घटनांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक खून व प्राणघातक हल्ले झाले असून त्यातील काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश देखील आले आहे ,मात्र काही घटनांचा तपास मात्र झालेला नाही.

संशयितांनी हा कट्टा व झायलो वाहन विलास सपकाळे यांचे असल्याचे सांगितल्याने भूषण लिलाधर चौधरी शहर पोलीस ठाणे भुसावळ त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या