Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रचांदवड येथे ' ना नफा ना तोटा ' तत्वावर चना डाळ वाटप...

चांदवड येथे ‘ ना नफा ना तोटा ‘ तत्वावर चना डाळ वाटप कार्यक्रम

चांदवड ( जि. नाशिक ) पोलीस दक्षता लाईव्ह टीम -:- भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि मार्केटिंग फेडरेशन तर्फे ६० रुपये प्रति किलो प्रमाणे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चांदवड येथील उचित मूल्य केंद्र – आमदार डॉ राहुल दौलतराव आहेर जनसंपर्क कार्यालय चांदवड या ठिकाणी नागरिकांना भारत दाल वितरित करण्यात आली.

चांदवड तालुक्यातील असंख्य नागरिकांनी या उचित मूल्य केंद्राला भेट देत भारत दाल खरेदी करत यावर्षीची दिवाळी आनंदाने साजरी करणार असल्याची भूमिका यावेळी व्यक्त केली. यंदाच्या दुष्काळी वातावरणात अशा योजना नागरिकांसाठी वरदानच ठरणार आहेत अशा प्रकारची भावना लोक व्यक्त करीत आहेत.आमदार डॉ.आहेर यांनी हे उचित मूल्य केंद्र सुरू करून लोकांना स्वस्त भारत दाल उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले जात आहेत.

सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर या पाच दिवसात ९.७५० मेट्रिक टन भारत दाल वितरित करण्यात आली.या दरम्यान चांदवड तालुक्यातील एकूण ३२०० कुटुंबांस लाभ देण्यात आला.आमदार डॉ.आहेर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या