Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यागॅस सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता..

गॅस सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता..

दिल्ली/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- दिल्ली-सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी असून गॅस सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे. कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल ७५.९५ डॉलरवर आले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

तेल कंपन्यांनी एप्रिल २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशातील बहुतांश शहरांमध्ये वाहनचालकांना पेट्रोल-डिझेलसाठी १०० रुपयांपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहेत. पेट्रोलचे दर १०० रुपये आणि डिझेल ९० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नेमके कधी कमी होणार, याचीच प्रतिक्षा अनेकांना आहे. दरम्यान, कच्चा तेलाचे दर झपाट्याने कमी झाल्याने आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ, असं अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्या मुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त…

गेल्या २४ तासांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या दरात घसरण झाली. कच्चा तेलाच्या दरात घसरण होताच भारतीय तेल कंपन्यांनी सोमवारी इंधनाचे नवे दर जारी केले. त्यानुसार, महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर १ रुपये आणि डिझेल प्रतिलिटर ९७ पैशांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय राजस्थान आणि झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेशात पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी महागले आहे. उत्तराखंड, तामिळनाडू आणि गुजरातमध्येही पेट्रोल- डिझेल दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ९०.०८ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या