Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावदोन दिवसात जळगाव,नाशिक धुळे व नंदूरबार येथे पाऊस बरसणार...

दोन दिवसात जळगाव,नाशिक धुळे व नंदूरबार येथे पाऊस बरसणार…

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नाशिकसह नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, ठाणे, पालघर आणि मराठवाडा विभागात दोन दिवस पावसाची शक्यता आहे.काही भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आयओडीची परिस्थिती

पुढील दोन महिने अल निनोचे १.६ इतके तापमान असून, प्रभाव कायम राहील. जानेवारी, फेब्रुवारीनंतर हळूहळू तीव्रता कमी होत जाईल. मे, जून, जून, जुलै २०२४ मध्ये ३० टक्के अल निनोची, ३० टक्के ला निनोची आणि ६० टक्के न्यूट्रल परिस्थिती राहणार आहे. आयओडीची परिस्थिती पुढील १५ दिवस कायम राहणार आहे. मात्र, डिसेंबरमध्ये आयओडी न्यूट्रल परिस्थितीत येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तर महाराष्ट्रात अशी राहील स्थिती-

नाशिकच्या पश्चिम भागातील पेठ, त्र्यंबकेश्वर परिसरात ५० ते ६० मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पूर्व भागातील तालुक्यांत २५ मिलीमीटर पासून काही भागात ४० ते ४५ मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नंदुरबारच्या काही तालुक्यांत ५० मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज असून, काही भागात ३० ते ३५ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे पश्चिम भागात ५० ते ५५ मिलीमीटरपर्यंत पाऊस होईल. इतर ठिकाणी २५/३०/३५ मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. जळगावच्या अनेक भागांत ४० मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर उत्तर भागातही जोरादार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता जायभावे यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या