Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसानीच्या पंचनामांचे तत्काळ आदेश

चांदवड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसानीच्या पंचनामांचे तत्काळ आदेश

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चांदवड तालुक्यामध्ये दि. 26.11.2023 रोजी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले बाबतची माहिती प्राप्त होत आहे. अशा भागातील शेतीपिकांचे पंचनामे गावस्तरीय समिती म्हणजे तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांचे संयुक्त स्वाक्षरीने तात्काळ पूर्ण करणेबाबत मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांचे निर्देश आहेत.या आदेशान्वये दि. 26/11/2023 रोजी व त्यादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे संबंधित गावांचे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात शेतात जावुन 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व अहवाल ग्रामस्तरीय अधिकारी यांनी कृषी विभाग यांचेमार्फत तहसिल कार्यालयात सादर करावा नुकसान झालेल्या शेतीपिकांचे GPS Enabled फोटो मोबाईल ऍपच्या साहयाने काढावे. तसेच समिती सदस्यांनी एकमेकांशी समन्वय साधुन पंचनामे लवकरात लवकर पूर्ण होतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच सदर पंचनाम्याबाबतची माहिती ही विहित 14 मुददयांमध्ये Soft Coppy सह इ पंचनामा प्रणालीवर अपलोड करावी. सदरील कामात हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 52 अन्वये कार्यवाही करण्यात येईल तसेच चुकीचे पंचनामे केल्याचे आढळुन आल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अन्वये संबंधितांवर कार्यवाही करणेत येईल याची नोंद घ्यावी, असे चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या