Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeजळगावपो.कॉ.वसिम रहेमान मलिक 2023 भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार ने सन्मानीत

पो.कॉ.वसिम रहेमान मलिक 2023 भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार ने सन्मानीत

भुसावळ/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समजसेवक यांना “भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे.वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा गौरव व सन्मान करण्यासाठी व या पुरस्कारासाठी अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांचे कोअर कमिटी सदस्य यांनी राज्यातील विविध जिल्ह्यातील गावा गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळ यांच्याकडून भव्य दिव्य असा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. व पुरस्कार देण्यात आले.

कोरोना काळात संकटामध्ये समाजातील घटकांसाठी आपला जीव धोक्यात घालून माणूसकी दाखविली आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपला अशा लोकांचा सन्मान भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन करण्यात आला.महाराष्ट्र पोलीस प्रशासनात सेवा बजावत असताना पो.कॉ.वसिम रहेमान मलिक यांनी कोरोना काळात पोलीस डिपार्टमेंट मधील पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाल्यास वसिम मलिक यांनी तात्काळ व महत्त्वाची मदत करून तात्काळ उपचार करवून घेऊन त्यांची प्रकृती सुधरेपर्यंत काळजी घेतली.त्यांनी केलेल्या या मोलाच्या कामगिरी मुळे त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली.

वसिम मलिक हे सामाजिक कार्यातही नेहमी कार्यरत असतात. त्यांनी त्यांची मुलगी मारिया मलिक चे आता पर्यंतचे पाच वाढदिवस साजरे केले ते ही अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस साजरा न करता गरीब व गरजू, गरजवंताना अन्न, कपडे व इतर साहित्य वाटप केले. त्यामुळे पो.कॉ.वसिम रहेमान मलिक यांना भुसावळ येथे भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या