Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमपंडित मिश्रा यांचे शिव महापुराण कथावाचन वेळी चोरट्या महिला मंगलपोत लबावितांना पोलिसांच्या...

पंडित मिश्रा यांचे शिव महापुराण कथावाचन वेळी चोरट्या महिला मंगलपोत लबावितांना पोलिसांच्या ताब्यात

२७ संशयित महिलांना घेतले ताब्यात; सर्व महिला मध्यप्रदेशातील..!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी कथा सुरू असताना कथेला आलेल्या भाविक महिलांच्या सोन्याच्या पोत चोरीला गेल्या. याप्रकरणी एकूण २७ संशयित महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले असून सर्वच्या सर्व संशयित महिला ह्या मध्यप्रदेशातील आहेत. मंगलपोत चोरी झालेल्या भाविकांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु आहे.

पोलिसांची संख्या गर्दीच्या मानाने खूपच कमी..

मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजीपासून कानळदा रोडवरील वडनगरी फाट्यावर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेला सुमारे साडेतीन लाखांहून अधिक भाविक आलेले आहेत. या कथेसाठी भाविकांच्या सुरक्षेसाठी २ हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अधिकचा बंदोबस्त हा वाहतूक सुरळीत करण्यासाठीच खर्ची होत असून पोलिसांची गर्दीच्या मानाने संख्या खूपच कमी असून त्यामुळे सुरक्षा कामी पोलिसांची तारांबळ उळतांना दिसत आहे.कथेच्या पहिल्याच दिवशी काही संशयित चोरट्या महिलांनी भाविक महिलांच्या सोनसाखळ्या, मंगलपोत चोरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.कथास्थळी ज्या भाविक महिलांच्या पोत चोरल्या गेल्या त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तीन भाविक महिलांच्या तक्रारी घेण्यात आल्या असून काही महिला तक्रार देत आहेत.

मंगलपोत चोरणाऱ्या एकूण २७ संशयित महिला मध्यप्रदेशातील

पोत चोरणाऱ्या एकूण २७ संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सर्व महिला मध्यप्रदेशातील इंदोर, सेंधवा, निमचं जिल्ह्यातील असल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या दरम्यान जळगाव तालुका पोलीस स्टेशनला महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या