Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमसुप्रिम कॉलनीत गुन्हेगाराला पुन्हा दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश

सुप्रिम कॉलनीत गुन्हेगाराला पुन्हा दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश

उपविभागीय अधिकारी यांनी दिले आदेश..

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- सात वर्षांपुर्वी जिल्हाप्रशासनाने सुप्रिम कॉलनीत दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला हद्दपार केले होते. त्याने परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण केल्यामुळे उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी शनिवार रोजी आकाश भास्कर विश्वे (३४) रा. भगवा चौक, सुप्रीम कॉलनी या गुन्हेगाराला पुन्हा दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, आकाश विश्वे रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून याने सुप्रीम कॉलनी परिसरात प्रचंड दहशत मजविली आहे. या अगोदर त्याच्यावर २०१४ पासून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दुखापत करणे असे आठ गुन्हे दाखल आहे. त्याची परिसरात दहशत पाहता त्याला २०१६ मध्ये एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही त्याने दहशत निर्माण करत अनेक प्रकारचे गुन्हे करणे सुरूच ठेवले. या गुन्हेगारीला वचक व आळा बसावा यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत दोन वर्षांसाठी आकाश विश्वे याला हद्दपार केले आहे.

आकाश विश्वे वरील या हद्दपारीच्या प्रस्तावाची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, निलोफर सैयद, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे, नरेंद्र मोरे यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या