Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नशिराबाद येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नशिराबाद येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- येथील पीजी कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद अंतर्गत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नशिराबाद यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ.प्रमोद आमोदकर व डॉ.आशुतोष भंगाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

पी.जी.कुमावत सर यांचे शिक्षण क्षेत्रामध्ये तसेच कलाक्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे त्यांनी कलाशिक्षक म्हणून सेवा केली. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात डॉ.प्रमोद आमोदकर व डॉ.आशुतोष भंगाळे यांनी  विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.

पि.जी.कुमावत सर यांच्या मुलांनी त्यांचाच कला शिक्षकांच्या वारसा घेत कला क्षेत्रात आपला ठसा उमटविला असून त्यांची मुले श्याम कुमावत सर, प्रताप कुमावत व निलेश कुमावत यांनी पी जी कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद ची स्थापना करून प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुलांना शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून उपलब्ध व्हावं यासाठी नशिराबाद मध्ये त्यांनी प्रतिष्ठानची स्थापना केली व या माध्यमातून कुमावत बंधू कलाक्षेत्र शैक्षणिक क्षेत्र यामध्ये अग्रेसरपणे काम करत आहे.

तर श्याम कुमावत सर यांनी नशिराबाद येथे कला प्रेमींसाठी कलाग्राम ची स्थापना केली आहे. त्यात ते 5 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा राहण्यापासून ते शिक्षणाचा पूर्ण खर्च स्वतः करणार आहेत. कलाग्रामचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्णत्वास येईल

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या