Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजिल्हा कारागृहात मानवी स्पर्शाद्वारे चालणाऱ्या  ई-किऑक्स मशीनचे लोकार्पण

जिल्हा कारागृहात मानवी स्पर्शाद्वारे चालणाऱ्या  ई-किऑक्स मशीनचे लोकार्पण

जिल्हा कारागृहात मानवी स्पर्शाद्वारे चालणाऱ्या  ई-किऑक्स मशीनचे लोकार्पण

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्हा कारागृहात मानवी स्पर्शाद्वारे चालणाऱ्या ई-किऑक्स मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

या मशिनद्वारे कारागृहातील कैद्यांना केसेसच्या स्थितीबद्दल माहिती मिळणार..!

याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक ओ. आर वांदेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन विठ्ठल पाटील, तुरुंगाधिकारी एस.पी.कवार, आर.ओ. देवरे आदी उपस्थित होते. ई-प्रिसन्स् (e-prisons) च्या बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत ई-किऑक्स (Biometric Touch Sereen e-Kiosk Machine) मशीन कारागृहास प्राप्त झाले आहे. या मशिनद्वारे कारागृहातील बंद्यांना प्रकरणाची स्थिती, कैदीच्या खात्यात शिल्लक खाजगी रोख शिल्लक, पुढील सुनावणीची तारीख, माफी, मजुरी सुविधा, पॅरोल / फर्लो अर्जाची स्थिती, प्रकाशन तारीख, उर्वरित फोन व मुलाखत संधी यांची माहिती घेता येईल.

छत्रपती संभाजीनगरच्या समता फौंडेशनच्या वतीने कैद्यांच्या मनोरंजनासाठी एलईडी टीव्हीचे २ संच भेट देण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या