Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले ...! निवासी उपजिल्हाधिकारी कासार यांच्यावर...

जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले …! निवासी उपजिल्हाधिकारी कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला…

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असून त्यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.वाळूच्या डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळू माफियांनी जोरदार प्राणघातक हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

” यांना दाखवा रे आपला दणका म्हणत निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर केला हल्ला.

या संदर्भात मिळालेली अधिकृत माहिती अशी की, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार श्री.बनसोडे हे रात्री भुसावळच्या दिशेने शासकीय कार्यक्रमाला जागा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना बारा वाजेच्या सुमारास त्यांना राष्ट्रीय महामार्गावर महेंद्रा शोरूमच्या जवळ वाळूचे डंपर दिसले. त्यांनी तहसीलदार बनसोडे यांना या डंपरवर कारवाई करण्याचे सांगितले. यानुसार कारवाई सुरू असतांनाच दुसरे डंपर आले.चौकशी सुरू असताना थोड्याच वेळात दुचाकी आणि चारचाकीतून वाळू माफिया आले.ते लोक अत्यंत उद्धट व अरेरावीच्या भाषेत या जिल्हा प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यां बोलत हुज्जत घालत होते.
तसेच शिवराळ भाषा वापरून ” यांना दाखवा रे आपला दणका “..असे सांगून या टोळक्याने निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे यांच्यावर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला चढविला. यात सोपान कासार हे जखमी झालेत. त्यांच्या शासकीय वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी यांनी घेतली धाव

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी यांच्यासह अधिकार्‍यांनी धाव घेतली.दरम्यान या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे.उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाळू माफियांनकडून झालेले तीन महिन्यांतील हल्ले..

गेल्या 3 महिन्यात यावल, भुसावळ येथील काही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला झालेला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच एरंडोल येथील प्रांताधिकार्‍यांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतांना थेट निवासी उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाळू माफियांवर आता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांनी कडक कारवाईचा लगाम उगारावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या