Saturday, November 16, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याराज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा आता 9 नंतर भरणार ; सरकारने का घेतला निर्णय...

राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा आता 9 नंतर भरणार ; सरकारने का घेतला निर्णय ?

राज्यातील इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 7 वाजता न भरवता 9 वाजेनंतर भरवण्याच्या सूचना.

मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य सरकारने शालेय शिक्षणाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 7 वाजता न भरवता 9 वाजेनंतर भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे राज्यपाल रमेश बैसे यांनी 5 डिसेंबर 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात याबाबत महत्त्वाची सूचना केली होती. त्यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला.

राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे घेतले गेले अभिप्राय.

सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय तसेच विविध शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. यामध्ये सर्वात
महत्त्वाच्या बाबी समोर आल्या.यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा विद्यार्थ्यांच्या झोपेचा होता. विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने अभ्यास करण्यात उत्सुकता राहत नाही, असं पालकांचं मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने अभ्यास करुन याबाबत सर्व शाळांना महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारने आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी केला राज्यातील शाळांच्या वेळाचा अभ्यास.

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक 5 डिसेंबर 2023 ला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल महोदय रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या