Wednesday, September 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईममाहिती अधिकारात माहिती न मिळाल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना फोनवरून धमकी..

माहिती अधिकारात माहिती न मिळाल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना फोनवरून धमकी..

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याच्या कारणावरून थेट अधिकाऱ्याला फोनवरून मारहाण करण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे.

माहिती अधिकारात संशयीत इसमाने मागितलेली माहिती त्याला न मिळाल्याने त्याने थेट वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घडला आहे.

असा घडला फोनवरून धमकी देण्याचा प्रकार…

सविस्तर वृत्त असे की,महेंद्र पाटील या इसमाने हा प्रकार केला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी काही माहिती माहितीचा अधिकार मागितली होती. ती माहिती त्याला न मिळाल्याने त्याने थेट वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना फोन करून मोबाईलवरून शिवीगाळ केली. त्यात रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण करेल, अशी धमकीही त्याने दिली. या प्रकरणी दि.१६ फेब्रुवारी शुक्रवार रोजी डॉ. विजय गायकवाड यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या