Wednesday, September 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 46 लाखापेक्षा...

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 46 लाखापेक्षा अधिक रुपयाचा मु्द्देमाल जप्त.

भुसावळात अवैध बनावट मद्य कारखान्या विरोधात धडक कारवाई.

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकुन बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना ०१ आरोपीला अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर 46 लाख 37 हजार पाचशे एवढ्या किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक
डॉ. व्ही. टी. भुकन यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

भुसावळ येथे हा अवैध बनावट मद्यसाठा मिळून आल्याने येथे मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याबाबत कसून तपास सुरू असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक अं. व दक्षताप्रसाद सुर्वे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आल्याचे भुकन यांनी सांगितले.

या कार्यवाहीत जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन, भुसावळचे विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, निरीक्षक अन्वर खतीब यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या