Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवड ला होणार लवकरच शिवस्मारक सृष्टी...अखेर प्रतीक्षा संपुष्टात....

चांदवड ला होणार लवकरच शिवस्मारक सृष्टी…अखेर प्रतीक्षा संपुष्टात….

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह :- : चांदवड येथे श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवस्मारकाचा महत्त्वपूर्ण विषय चांदवड नगरपरिषद हद्दीमध्ये लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती चांदवड येथील शिवस्मारक अश्वारूढ पुतळा निर्माण कमिटी,चांदवड यांच्या समितीने आज शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त मांडली आहे.

चांदवड शहरात अतिशय आनंदाचे वातावरण असून ही आनंदवार्ता मिळताच सर्वांच्या मना- मनात सर्वांच्या घराघरात असून तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचा, विचारांचा, समाजाला न्याय देण्याचा लढा, डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या कर्तुत्वाला उजाळा देत आज या नवीन शिवसृष्टी पुतळा निर्माण कमिटी यांच्या माध्यमातून चांदवड शहरात बाजारतळ येथे या शिवसृष्टीची स्थापना लवकरच होणार आहे. यासाठी चांदवड शहराचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल चांदवड शहरातील प्रा.सचिन निकम आदी कमिटीचे पदाधिकारी हे मोठ्या जोमाने गेल्या एक वर्षा पूर्वी पासून तयारी करत असून यांनी आज या चांदवड येथील कर्मभूमीवर हा पुरातन पुतळ्यातून नवीन अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. या चांदवड शहराला एक नवीन अस्तित्व लाभणार आहे.

यासाठी चांदवड शहरातून सर्व जाती धर्मातील समाजातील बारा बलुतेदार व अठरापगड जाती हे उद्दिष्ट समोर ठेवून समाजाला न्याय देणारा व्यक्ती घेत 51 व्यक्तींची कमिटी स्थापन केलेली असून लवकरच अश्वारूढ पुतळा निर्माण करण्याची हमी या कमिटीद्वारे घेण्यात आली आहे. चांदवड नगरपरिषद येथील पुरातन शिवाजी महाराज यांचा पुतळा हा बऱ्याच दिवसाचा झाल्या असल्याने हा या समितीने निर्णय घेत या पुढे शासकीय पत्रव्यवहार करत विविध ठिकाणी जाऊन शासकीय कार्यालयाच्या परवानगी साठी पूर्ण तयारी केलेली आहे. तरी देखील यासाठी विशेष असे वेगवेगळे नियोजन केलेले असून लवकरच त्या नियोजनानुसार या कामासाठी समिती आपले कर्तुत्व पार पडणार असून, यासाठी तमाम तालुक्यातील शिव प्रेमींनी आपले योगदान देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अश्वारूढ पुतळा निर्माण कमिटी, चांदवड यांच्या वतिने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या