Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावगारपीट व वादळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची खा. रक्षाताई खडसे यांनी केली...

गारपीट व वादळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची खा. रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी …

रावेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर लोकसभा अंतर्गत नांदुरा तालुक्यातील शेती शिवारात काल रात्री गारपीट व वादळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रोटी, पातोंडा आणि पलसोडा शेती शिवारात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. खासदार खडसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच संबधित महसूल अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून, योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस ब्रम्हानंद चौधरी, गणेश भोपळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष यश संचेती, रवींद्र इटखेडे, उमेश ताकवले, सनी तेलंग, अमोल डाहाके, ज्ञानेश्वर खवले, सोपान खवले, बुथप्रमुख मोहन घुळे, सरपंच छाया संजय उगले, राहुल उगले, ज्ञानदेव घुळे, निवृत्ती घुळे, तेजस घुळे, कैलास घुळे, शत्रुघ्न पाचपोर, पहाडसिंह सूरळकर तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या