Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद मध्ये ५८ लाखाचा गुटखा जप्त; गोडाऊनवर छापा टाकत कारवाई...!

नशिराबाद मध्ये ५८ लाखाचा गुटखा जप्त; गोडाऊनवर छापा टाकत कारवाई…!

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरातील गोडाऊन वर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून राज्यात बंदी असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे. या कारवाईत पथकाने एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की,अन्न् व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा चोरट्या पध्दतीने वाहतूक व विक्री करण्याचा व्यवसाय नशिराबाद परिसरातील एका गोडवूनमधून चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार पथकाने सापळा रचत नशिराबाद परिसरातील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या गोडावून वर छापा टाकत बनावट टाटा अल्ट्रा वाहनाद्वारे गोडाऊन मध्ये विमल पान मसाला (गुटखा) व सुगंधित तंबाखूचा साठा उतरवत असताना पथकाद्वारे हस्तगत करण्यात आला.

शरद पवार यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली कारवाई…

सदर कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता विभाग अन्न सुरक्षा अधिकारी जळगावचे शरद पवार यांच्या संपूर्ण पथकाने केली. पथकाद्वारे करण्यात असलेल्या कारवाईत सुमारे ४८ लाख २७ हजार ९०० रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा, वाहन किंमत सुमारे १० लाख रुपये मात्र असा एकण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.

गोडाऊन सिल; दोन संशयित ताब्यात; फरार आरोपींचा शोध..!

याप्रकरणी साठा आढळून आलेले गोडाऊन सिल करण्यात आले असून, कारवाईत संशयित मिथुन कुमार साहनी (रा. बिहार), अजयकुमार कापोरी साहनी (वय १८, रा. बिहार) या दोघांना अटक करण्यात आली. यादरम्यान वाहन चालक अब्दुल झहीर खान (रा. खरजना, इंदोर), वाहन मालक बलविर सिंह बग्गा (रा. इंदोर), क्रेटा वाहनातून फरार झालेला मामा नामक मॅनेजर तसेच जागा मालक व साठा मालक यांच्या विरोधात शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नशिराबाद पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास नशिराबाद पोलीस अधिकारी करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या