Tuesday, December 3, 2024
police dakshta logo
Homeजळगावमाजी मंत्री एकनाथ खडसे यांची घर वापसी...

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची घर वापसी…

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह :- शनिवार दि. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी माजी मंत्री तसेच विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटनेते एकनाथ खडसे यांची भाजप मध्ये घर वापसी होणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असून, जिल्ह्यातील भाजपमधील वातावरण पूर्णपणे बदलणार असून, मागील काही वर्षांपासून त्यांच्या मागे सातत्याने विविध चौकशी व आरोप झालेत व यांच्या माध्यमातून त्यांना राजकारणात निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याला शह देण्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार म्हणून ते निवडून आले व त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर गटनेते म्हणून जबाबदारी मिळाली. अशा प्रकारे शरद पवार यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.

भाजप कडून राज्यपाल म्हणून जबाबदारी दिली जाणार

आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये घर वापसी करणार असून आहे. त्यांना भाजप कडून राज्यपाल म्हणून जबाबदारी दिली जाणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण

गेल्या तीन वर्षांमध्ये एकनाथराव खडसे व गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत होते. या दरम्यान त्यांच्यात नेहमीच अक्षरशा खालच्या पातळीवरील टीका टिप्पणी केली जात होती. एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. एकनाथराव खडसे भाजपमध्ये आल्यानंतर भाजपचे अमोल जावळे यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटामार्फत सुरू असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या