पोलीस दक्षता लाईव्ह : नाशिक दि.10 जुन रोजी मनमाड मुंबई पंचवटी सुपर फास्ट एक्सप्रेस ने प्रवाश्यांच्या व्यथा जाणून घेणेसाठी आमच्या पोलीस दक्षता लाईव्हच्या प्रतिनिधिने मनमाड मुंबई पंचवटी सुपर फास्ट एक्सप्रेस मधून प्रवास सुरु केला असता त्यात अप डाऊन करणारे MST पास धारक कर्मचारी व इतर प्रवाश्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्या. त्यात पंचावटी गाडीने ये जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून बोगी मात्र मर्यादित आहेत यामुळे नेहमी ये जा करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, यासाठी बोगी संख्या वाढवीने अपेक्षित आहे.तसेच गाड्यांची संख्या वाढवून वेळेवर गाड्या पोहोचणे गरजेचे आहे.अश्या प्रकारच्या व्यथा त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधतांना व्यक्त केल्या.