Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रभारत योगाची व योग्यांची जननी आहे..! विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपावा.....

भारत योगाची व योग्यांची जननी आहे..! विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपावा.. ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. रवींद्र भोळे महाराज

भारत योगाची व योग्यांची जननी आहे..!

पुणे/उरळी कांचन/पोलीस दक्षता लाईव्ह :- धर्माच्या उत्पत्ती नंतर हजारो वर्षांपूर्वी योगाची उत्पत्ती झाले असावी. भगवान शिवाला आद्य योगी , आदिगुरू संबोधण्यात येते. भगवान श्रीकृष्ण ,महावीर ,बौद्ध यांनी योगाची उपासना केली. महान ऋषी शंडील्याने भगवान श्रीकृष्णाला योगाची दीक्षा देऊन योग गुरु ठरले. योगामुळे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक ऊर्जा मिळते. परमेश्वराविषयी जिज्ञासा वाढवण्यासाठी अष्टांग योग खूप महत्त्वपूर्ण आहे. रोग्याला योगी बनवण्याची क्षमता योगामध्ये आहे. अशा या योगाची भारत ही जननी आहे. भारत योगाची व योग्यांची जननी आहे असे मत ज्येष्ठ समाज सुधारक ह भ प डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. जागतिक योगा दिना निमित्ताने सरस्वती शाळा उरुळी कांचन येथे योग उपचार मार्गदर्शन व योगाची प्रात्यक्षिके यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर रवींद्र भोळे यांनी योगा विषयी माहिती देताना वरील मत व्यक्त केले. याप्रसंगी पुढे मत व्यक्त करताना ज्येष्ठ समाज सुधारक ,पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की योगाद्वारे भविष्यात होणारे आजार समूळ नष्ट होऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी निरोगी राहण्यासाठी तसेच अभ्यासामध्ये एकाग्रता प्राप्त करून बुद्ध्यांक वाढविण्यासाठी योगा करावा असे मत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कुंजीर सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. व जागतिक योगा दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर,सर्व शिक्षक संजय कुंजीर सर, किरण तळेले,मनीषा मेमाणे,अमोल कुंजीर, लीना दिवार , लता चव्हाण, स्मिता तोडकरी , सरस्वती शाळेतील सर्व विद्यार्थी वर्ग पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपावा.. ज्येष्ठ समाजसुधारक डॉ.रवींद्र भोळे महाराज

शासन विविध शैक्षणिक योजना राबवून शेवटच्या माणसाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाचा हया शैक्षणीक विविध योजनेचा लाभ घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीचे भान ठेवावे, विविध शास्त्राचे पठण करून बुद्धिवान व्हावे. ज्याप्रमाणे योद्धा रणांगणावर फक्त युद्ध करण्यासाठी सज्ज होतो ,त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम होऊनशिक्षण घ्यावे, विद्या ग्रहन करुन नावलौकिक वाढवावा. आपले विविध छंद जोपासावेत. अन्न ,अक्षर याशिवाय आरोग्य सांभाळावे.विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर राष्ट्राचा सुसंस्कृत वारसा जपावा, असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. येथे सरस्वती विद्यामंदिर शाळेत शासनाच्या वतीने देण्यात येणारे शालेय पुस्तक वाटप कार्यक्रम व शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरस्वती शाळेचे उपाध्यक्ष ,जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे प्रमुख मार्गदर्शनात पुढे म्हणाले की सरस्वती शाळेमध्ये विविध सांस्कृतिक ,सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर यांनी ई लर्निंग प्रोजेक्ट आपल्या स्वर्गीय मातोश्री सुभद्राबाई गुलाब कुंजीर यांच्या स्मरणार्थ भेट दिला ,हे कार्य कौतुकास्पद आहे. याप्रसंगी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते मुलांना शाळेतील प्रथम दिनानिमित्ताने पुष्पगुच्छ देण्यात आले. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या शालेय पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.तसेच विध्यार्ध्याना खाऊ व फळे वाटप करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर उरुळी कांचन चे नवनिर्वाचित सरपंच अमित बाबा कांचन ,रुकसाना अत्तार मॅडम बँक अधिकारी बँक ऑफ इंडिया, रोहिदास मुरकुटे, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर ,हेमलता काळे, भारती गोते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्याचप्रमाणे प्रमुख मान्यवरांमध्ये मनीषा मेमाणेमॅडम, संजय कुंजीर सर अमोल कुंजीर सर ,लीना धीवार मॅडम ,किरण तळेले सर ,स्मिता तोडकरी मॅडम ,लता चव्हाण मॅडम,इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाला पालक वर्ग श्री खंडागळे, श्री पाटोळे, श्री ननावरे, श्री डोलारी इत्यादी पालक वर्ग उपस्थित होते. ह्या प्रसंगी शाळेमध्ये रांगोळी काढून पुष्प सजावट, कऱण्यात आली होती. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या