Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद मधील सेतू केंद्राचा एकदिवसीय संप

नशिराबाद मधील सेतू केंद्राचा एकदिवसीय संप

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजने चे फॉर्म भरण्यासाठी सेतू केंद्राना कोणतेही दर देण्याचे निश्चित केलेले नसताना देखील सेतू केंद्रानी फॉर्म साठी पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. हा सेतू चालकांवर अन्याय होत असल्याचे सांगत ह्या बाबींचा निषेध म्हणून नशिराबाद मधील ऑनलाईन सर्विसेस संघटनेने आज दिनांक 8 जुलै रोजी एकदिवसीय संप पुकारला आहे.

अन्याय ग्रस्त सेतू चालकांच्या प्रमुख मागण्या..

सेतू चालवण्यासाठी वीजबिल, दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, कॉम्पुटर तसेच प्रिंटर साठी लागणारे मेंटेनन्स या गोष्टींचा विचार करता फ्री मध्ये फॉर्म भरायला कसे परवडणार असा प्रश्न नशिराबाद मधील सेतू चालकांनी उपस्थित केला आहे. तरी याची दखल सरकारने घ्यावी अशी मागणी सेतू केंद्र चालकांमार्फत करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या