Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeजळगावसेवाभावी संस्थांच्या नावाखाली मांडला जातोय पुरस्कारांचा धंदा..

सेवाभावी संस्थांच्या नावाखाली मांडला जातोय पुरस्कारांचा धंदा..

विशेष वृत्तांकन,

पैसे द्या अन पुरस्कार घ्या’..  भाग नंबर – १..

जळगाव/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात अशा अनेक सेवाभावी संस्था आहेत.आणि होऊनही गेल्या अधून मधून ती आपली नावे बदलवत असतात पैसे द्या आणि पुरस्कार घ्या, अशा अनेक संस्थांनी पुरस्कारांचा गोरख धंदा मांडला आहे. त्यानिमित्ताने आम्ही आपल्यासाठी घेउन आलेलो आहोत या विषयावर विशेष वृत्तांकन मालीका.

पैसे द्या अन पुरस्कार घ्या’.  अश्या प्रकारे चालतो गोरखधंदा…

शासकीय नोकरीस कार्यात असणारे अधिकारी, कर्मचारी वर्ग, इतरस्त कर्मचारी यांच्या याद्या तयार करणे, यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवणे, पैशांची मागणी करणे आणि पुरस्कार घेण्यासाठी बळी पाडणे असे अनेक प्रकार सद्या सर्रास सुरू आहेत. ह्या संस्था काय आहेत?  ही संस्था कुठले काम करते? या खरच सेवाभावी संस्था आहेत का? यांनी आजपर्यंत समाजात कोणकोणती कामे केलीत? याचा कुठे लेखाजोखा आहे का? या वर्षभर कुठेच दिसत नाही, पण या संस्था मात्र पुरस्कार वितरणाच्या वेळेस सोशल मीडियावर दिसते. या नाममात्र संस्थाचा काही आता पत्ताच नसतो. वर्षभरापासून या संस्थांची कुठलीच सामाजिक कामे दिसत नाहीत. असे अनेक संस्था चालक आहेत की त्यांचे कुठलेच सामाजिक कार्य नसून त्यांनी चालवीलेला हा गोरख धंदा आहे. फक्त शासकीय कर्मचारी तसेच अधिकारी समाजसेवक यांना गंडवण्याचा काम ते करत असतात. आमची संस्था अशी आहे. आमच्या संस्थेकडून वर्षभरात उल्लेखनीय कामे करणाऱ्यांचा आढावा घेतला जातो. व त्यांना संस्थेतर्फे गौरविण्यात येते. आम्हाला आपले काम कौतुकास्पद वाटले. आम्ही आपल्याला आमच्या संस्तेतर्फे पुरस्कार देऊ, अवार्ड देऊ, ट्रॉफी देऊ, यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते तुम्हाला सन्मानित केले जाईल अशा प्रकारे बतवण्या केल्या जातात. कार्यक्रमाच्या ठिकाणीं सर्वांना चहा पाणी, नाश्ता, जेवणाची अशी सगळी व्यवस्था केली जाईल. कार्यक्रमाचे ठिकाण नामांकित पंचतारांकीत हॉटेल्स, हॉल्स, लॉन्स यांची नावे सांगत समोरच्य व्यक्तीला मोहित केले जाते व अशा प्रकारच्या भूलथापा देत त्यांना अलगत जाळ्यात ओढले जाते.

पुरस्कारासाठी  सामोरच्यांना मुंबई ,पुणे, नाशिक इतरत्र शहरात बोलावतात व तेथे पुरस्कार देत असतात. अशा या गोरखधंद्याला अनेक जण बळी पडत असतात. मात्र ते अजूनही अनेकांच्या लक्षात येत नाही. पुरस्कारासाठी दहा हजार तर कोणी वीस हजार रुपये मोजत आहेत. आणि पुरस्कार घेऊन आपले नाव मोठे व्हावे या आशेने पुरस्कार स्वीकारत आहेत. या अशा पुरस्कार गोरखधंद्यात अनेक बोगस संस्थांनी आपला खिसा चांगलाच भरून घेतला आहे. मिळणारा पुरस्कार हा कुठल्या संस्थेचा आहे. ही संस्था काय कार्य करते. याबाबत पुरस्कार घेणाऱ्यांनी याची शहानिशा करून घेणे गरजेचे आहे. क्रमशः…….

(नावाला सेवाभावी संस्था मात्र बनावट पुरस्काराने अनेकांच्या खिशाला कात्री) मालिका दोन उद्या नक्की वाचा… फत पोलीस दक्षता लाईव्हवर…

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या