Saturday, November 16, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न.

जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न.

चालू आर्थिक वर्षात 755.99 कोटी एवढा निधी मंजूर; तर गेल्या आर्थिक वर्षात 657 कोटीचा निधी विविध विकासकामासाठी खर्च..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या आर्थिक वर्षात 657 कोटीचा निधी विविध विकासकामासाठी खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षात 755.99 कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यात विकास कामासाठी निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याची आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून लवकरच त्या बाबत नियोजन केले जाणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. सुरेश भोळे, आ. लता सोनावणे, सर्व अशासकीय सदस्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलु केजो, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी, विजय शिंदे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या