Wednesday, December 25, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानाशिक जिल्हा परिषदेत नवीन निवड झालेल्या ग्रामसेवकांना नियुक्तीची प्रतिक्षाच

नाशिक जिल्हा परिषदेत नवीन निवड झालेल्या ग्रामसेवकांना नियुक्तीची प्रतिक्षाच

नाशिक/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती 2023 ची परीक्षा होऊन गुणांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विधानसभा आचारसंहिता लागणे अगोदर अगदी आदल्या दिवसाला फोन करून दुसऱ्या दिवसापर्यंत कागदपत्र पडताळणी करून घेतली होती.त्यानंतर निवडणूक होऊन 1 महिना उलटला मात्र त्यानंतरही अंतिम निवड यादी प्रसिद्ध न झाल्याने ग्रामसेवकांना अजूनही पदभार मिळाला नसल्याने आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची नवीन तात्पुरत्या यादीतील उमेदवारांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे. नियुक्त्या कधी मिळतील याबाबत अजूनही ठोस माहिती मिळत नसल्याने परीक्षार्थी उमेदवार चितेत असल्याचे आज दिसून आले. यावर त्वरित मार्ग काढण्यात यावा अशी अर्जाद्वारे विनंती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या