जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दि.28 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गांजा तस्करी करणारी टोळी अमळनेर पोलिसांनी जेरबंद केली आहे.
याबाबत अमळनेर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांनी माहिती दिली असून, या छाप्यात ११,३९४००/- रुपये किमतीचा गांजा. ८,००,०००/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी क्रमांक MH१८ AJ ०२२३ एकूण १९,३९,४००/- रुपये किमतीचा मुद्यमान जप्त करण्यात आलेला आहे. केदार बारबोले यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, उज्वल मस्के, गणेश पाटील यांच्यासह ही कामगिरी केली आहे.