Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद सर्व्हिस रोडवर डंप्पर-मोटारसायकलचा भीषण अपघात: एक जागीच ठार; दोन गंभीर जखमी

नशिराबाद सर्व्हिस रोडवर डंप्पर-मोटारसायकलचा भीषण अपघात: एक जागीच ठार; दोन गंभीर जखमी

जळगाव/विशेष प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या आठवड्यात मोटारसायकल अपघातात वाढ झाली आहे. जळगाव येथे खान्देश बिट्स बँड पथकातील कामानिमित्त जळगाव शहरात दुपारी येत असताना नशिराबाद गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील एक तरुण ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तरुणाच्या नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.आणि एकच हंबरडा फोडला..तेजस सुनील बिन्हाडे (वय २९, रा.नशिराबाद ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, बहीण यांचेसह गावात राहत होता. तेजसचे वडील मजुरी काम करतात.तर त्याच्यासह त्याचे मित्र तुषार युवराज बिऱ्हाडे (वय १९), अजय सपकाळे (वय २२ सर्व रा.नशिराबाद ता. जळगाव) खानदेश बँड पथक येथे कामाला आहेत. सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. दरम्यान गुरुवार दि.15 मे रोजी जळगाव येथे बँड पथकाचे काम करण्यासाठी तेजस बिऱ्हाडे, तुषार बिऱ्हाडे आणि अजय सपकाळे हे दुचाकीने नशिराबाद येथून निघाले होते. काही अंतरावर आल्यावर राणे हॉटेल जवळ ,लक्ष्मी नारायण हॉल समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये तेजस बिऱ्हाडे हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर तुषार व अजय या गंभीर जखमी तरुणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.. तसेच काही वेळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद येथील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. या ठिकाणी तेजसचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेतील डंपर आणि त्यातील चालक यांना नशिराबाद पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी जमा केले आहेत. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या घटनेमुळे नशिराबाद गावावर एकच शोककळा पसरली आहे.गेल्या 20 दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे..या अपघाताची पुढील चौकशी नशिराबाद पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या