जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या ‘जलतारा’ प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जलतारा प्रकल्पामुळे होणारे फायदे:-
जलसाठा वाढतो,
भूगर्भजलाची पातळी सुधारते,
शेतीला वर्षभर पाणीपुरवठा शक्य होतो,
उत्पादनात वाढ होते.
“जलसंधारण हेच शाश्वत शेतीचे भविष्य आहे, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पुढे येऊन योगदान द्यावे,” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.