जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सम्राट कॉलनी परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. धीरज दत्ता हिवराळे (वय २२, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून, तो हूडको समोर रस्त्यावर तलवार (विविक्षित हत्यार) हातात घेऊन आरडाओरड करीत होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. १७.३० वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे धीरज हिवराळे याच्याविरुद्ध यापूर्वीही दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. प्रविण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे, रविंद्र कापडणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.