Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळातील घरफोडीचा बनाव उघड; घरफोडीचा बनाव करत पोलिसांत खोटी तक्रार

भुसावळातील घरफोडीचा बनाव उघड; घरफोडीचा बनाव करत पोलिसांत खोटी तक्रार

आईनेच ठेवले दागिने तारण, पोलिस तपासात खळबळजनक उलगडा.

भुसावळ/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- दि. १० जून रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील लिम्पस क्लबजवळील आर.बी.२/९५८A, नॉर्थ कॉलनी एरिया येथील घरात घरफोडी झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, ही घरफोडी प्रत्यक्षात झालेली नसून, ती एक बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, घराचे कुलूप अखंड असल्याचे आढळले. यावरून पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे यांच्या आई शर्मीला चंद्रमनी शिंदे (वय ४९) यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली.

सविस्तर वृत्त असे की, चेतन शिंदे यांना अलीकडील काळात जुगाराची सवय लागल्याने, त्यांनी घरातील दागिने व सावकाराकडून घेतलेले पैसे जुगारात गमावले. त्यानंतर पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, भुसावळ येथे स्वतःच्या व मुलाच्या नावाचे सोन्या-चांदीचे दागिने तारण ठेवून गोल्ड लोन घेतले. प्राप्त रक्कम जुगार, आईच्या उपचार व घरखर्चासाठी वापरण्यात आली. काही रक्कम पुन्हा जुगारातही लावल्याची कबुली त्यांनी दिली आहे.याची माहिती घरातील कोणालाही न देता त्यांनी घरफोडीचा बनाव रचत खोटी तक्रार दिली. पोलिसांनी बँकेतून संबंधित तारण पावत्या मिळवल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शरद बागल, सहा. फौजदार रवी नरवाडे, पो.हवालदार गोपाल गव्हाळे, पो.ह.कॉ. संदीप चव्हाण व चा.पो.कॉ. महेश सोमवंशी यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या