Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याखतांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बफर साठ्याची पाहणी

खतांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बफर साठ्याची पाहणी

खरीप हंगाम २०२५–२६ खतांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बफर साठ्याची पाहणी

जळगाव/प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- खरीप हंगाम २०२५–२६ दरम्यान शेतकऱ्यांना वेळेवर व आवश्यक त्या प्रमाणात खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, जळगाव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या युरिया व डीएपी खतांच्या बफर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी आज दिनांक १२ जून रोजी केली.या पाहणी दरम्यान साठवणूक व्यवस्था, खत वितरण प्रणाली, वाहतूक व्यवस्था व सुरक्षितता यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणधीर सोमवंशी, कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के, तसेच MAIDC चे विभागीय व्यवस्थापक श्री. सुनील इंगळे उपस्थित होते.

युरिया व डीएपी खत पिशव्यांवरील लेबलिंग, वजन, वापरासाठी सूचना यांची तपासणी करावी. साठवणूक स्वच्छता, सुरक्षितता या सर्व गोष्टी नियमानुसारच हव्या तसेच वितरण केंद्रांची कार्यपद्धती, रेक पॉइंट आणि लॉजिस्टिक यंत्रणा वेळेवर, पारदर्शक आणि काटेकोर खत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशा सूचना श्रीमती मीनल करनवाल यांनी यावेळी दिल्या. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या