Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक

जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणावर चर्चा करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची एकत्र बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद होते. त्यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत प्रभाग रचनेविषयीचा शासन आदेश, नव्याने प्रस्तावित प्रभागांबाबतचे स्पष्टीकरण, तसेच जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मतदार यादी सुधारणा;प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, “मतदार यादीतील अद्ययावत नोंद ही लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने आपली नोंदणी निश्चित केली पाहिजे.” त्यांनी सर्व राजकीय पक्षांना मतदार जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

सुव्यवस्थित निवडणूक प्रक्रियेसाठी एकमत

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि वगळण्याच्या प्रक्रियांविषयी सविस्तर माहिती दिली.
बैठकीदरम्यान सर्व पक्षांनी प्रशासनाला निवडणुका शांततेत, पारदर्शकपणे आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या