Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांनी अध्यात्मिकतेसह जीवन समृद्ध करावे; डॉ.रवींद्र भोळे यांचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी अध्यात्मिकतेसह जीवन समृद्ध करावे; डॉ.रवींद्र भोळे यांचे मार्गदर्शन

उरुळी कांचन/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- “विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानार्जनापुरतेच मर्यादित न राहता, अध्यात्मिकतेचा अंगीकार करावा. उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून व्यसनमुक्त राहून जीवनात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या उरुळी कांचन शाखेच्या वर्धापन दिन आणि दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सल्लागार व डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भोळे हेच होते.

अध्यात्मिकतेचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, “अध्यात्मामुळे जीवनाचे रहस्य, उद्देश व उच्च शक्तीची जाणीव होते. त्यामुळे आत्मिक शांततेसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच अध्यात्मिकतेचीही जोपासना करावी. थोरामोठ्यांचा आदर, गुरूंचा सन्मान आणि सकारात्मकतेकडे वाटचाल ही जीवनातील खरी प्रगती होय.” लोकमंगल समूहाच्या कार्याची स्तुती करताना त्यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “ही संस्था एक समूह नसून सामाजिक चळवळ आहे,” असे डॉ. भोळे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला पुणे विभागीय अधिकारी कमलाकर पाटील, शाखा अधिकारी अभिजीत साखरे, मारुती चौगुले, लक्ष्मी माळी, स्वाती बोरकर, पत्रकार सुनील तुपे, सल्लागार नंदकुमार मुरकुटे, अशोक कदम, परिघा कांचन, शुभांगी परिट, अक्षदा कांचन, अलका मदने यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाखाधिकारी अभिजीत साखरे यांनी केले. संस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी प्रास्ताविक करताना लोकमंगलच्या कार्याचा आढावा घेतला. लोकमंगल पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या