Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeशैक्षणिकहिंदी तृतीय भाषा, परंतु पर्याय खुला ; राज्य शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

हिंदी तृतीय भाषा, परंतु पर्याय खुला ; राज्य शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा तृतीय भाषा म्हणून निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “तृतीय भाषा म्हणून हिंदी सर्वसाधारणपणे शिकवली जाईल, पण ज्या विद्यार्थ्यांना इतर कोणतीही भारतीय भाषा निवडायची असेल, त्यांनी तशी इच्छा व्यक्त केल्यास त्यांना ती भाषा शिकण्यास मान्यता दिली जाईल.” शालेय शिक्षण विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या अनुषंगाने बहुभाषिक शिक्षणास चालना देणारा आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये भाषिक विविधतेला प्रोत्साहन मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या