Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभुसावळ येथे महावितरणच्या नव्या मंडळ कार्यालयाच्या स्थापनेसाठी बैठक

भुसावळ येथे महावितरणच्या नव्या मंडळ कार्यालयाच्या स्थापनेसाठी बैठक

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) चे नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात बैठक पार पडली. ही बैठक मुंबईतील फोर्ट येथील उर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि महावितरणचे संचालक प्रदीप भागवत उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महावितरणच्या नव्या मंडळ कार्यालयाच्या स्थापनेबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मंत्री संजय सावकारे यांनी महावितरण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सुविधा, आवश्यक साधनसामग्री आणि तांत्रिक बाबींकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. तसेच कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा वेळेवर मिळाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या