Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeनोकरीभारतीय रेल्वेतील मोठी भरती: 6,180 टेक्निशियन पदांसाठी संधी, अर्ज प्रक्रिया 28 जूनपासून...

भारतीय रेल्वेतील मोठी भरती: 6,180 टेक्निशियन पदांसाठी संधी, अर्ज प्रक्रिया 28 जूनपासून सुरू

नवी दिल्ली | नोकरी संदर्भ | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय रेल्वेने देशभरातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून टेक्निशियन ग्रेड १ आणि ग्रेड ३ या पदांसाठी तब्बल 6,180 जागा भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 28 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार असून 28 जुलै 2025 ही अंतिम मुदत असेल.

🧾 पदांची माहिती:
टेक्निशियन ग्रेड १ (सिग्नल) – 180 पदे

टेक्निशियन ग्रेड ३ (ओपन लाईन) – 6,000 पदे

एकूण जागा:-  6,180

📚 शैक्षणिक पात्रता:
ग्रेड १ साठी: भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, IT किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या शाखांमधील पदवीधर.

ग्रेड ३ साठी: संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण उमेदवार पात्र.

🎂 वयोमर्यादा:
ग्रेड ३: 18 ते 33 वर्षे

ग्रेड १: कमाल 36 वर्षे
(आरक्षित प्रवर्गासाठी वयात सूट लागू)

💰 वेतनश्रेणी:
ग्रेड १ साठी: ₹29,200/-

ग्रेड ३ साठी: ₹19,900/-

📝 भरती प्रक्रिया:
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे (CBT) केली जाणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल.

💵 परीक्षा शुल्क:
सर्वसाधारण/इतर मागास वर्ग: ₹500

SC/ST/PwD आणि महिला उमेदवार यांना शुल्कात सवलत

🌐 अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.

🗣 सूचना: उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात वाचूनच अर्ज करावा. बनावट वेबसाइट्सपासून सावध रहा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या