Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगावात 'हिट अँड रन' अपघात: पादचारी महिलेचा मृत्यू, चालक मद्यधुंद अवस्थेत

जळगावात ‘हिट अँड रन’ अपघात: पादचारी महिलेचा मृत्यू, चालक मद्यधुंद अवस्थेत

जळगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील महाबळ ते वाघनगर मार्गावर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. भरधाव चारचाकी वाहनाने पादचारी महिलेस धडक दिल्यानंतर वाहनाने आणखी दोघांना चिरडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, आरोपी वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात आहे.

मृत महिलेची ओळख वंदना सुनील गुजराथी (वय ४५, रा. महाबळ परिसर) अशी झाली आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्या रस्त्याने पायी जात असताना, शहराकडून येणाऱ्या एका वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धक्क्याची तीव्रता इतकी होती की त्या १५-२० फूट दूर फेकल्या गेल्या. वाहन चालकाने त्यानंतरही वेग कमी न करता पुढे जाऊन आणखी दोन व्यक्तींना धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाहन चालवणाऱ्या इसमाने मद्यसेवन केलेले होते. घटनानंतर तो वाहनासह पलायन करण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र वाहन चिखलात अडकले आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत मोंटू सैनी या चालकाला ताब्यात घेतले.

जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर वंदना गुजराथी यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याचे सांगितले असून, तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या