Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeअपघातनशिराबाद रिक्षा अपघात प्रकरणात गुन्हा दाखल; वसीम खान यांचा मृत्यू

नशिराबाद रिक्षा अपघात प्रकरणात गुन्हा दाखल; वसीम खान यांचा मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील महामार्गावरील महाजन हॉटेलजवळील वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर उशिरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत मृताच्या भावाने फिर्याद दिली असून चालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ४ जून रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास भुसावळ येथून नशिराबादच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेली रिक्षा (क्र. एम.एच. १९ बीजे ५४३१) महामार्गावरील महाजन हॉटेलजवळील वळणावर पलटी झाली. सदर रिक्षा चालक नईम खान सुभान खान (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघात घडला. या अपघातात रिक्षातील प्रवासी वसीम खान ईस्माईल खान (वय ३०, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर २२ जून रोजी दुपारी २.४६ वाजता मृताचे भाऊ ईमरान खान ईस्माईल खान यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश वराडे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंबंधीचा खबरी अहवाल संबंधित न्यायालयात सादर करण्यात आला असून, वरीष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या