Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeभुसावळदोन दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण अपघात ; दोन तरुण गंभीर जखमी

दोन दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण अपघात ; दोन तरुण गंभीर जखमी

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी (२५ जून) सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बराच वेळ रुग्णवाहिका न मिळाल्याने मदतीसाठी आरडाओरड सुरू होती. घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित असतानाही मदतीसाठी कोणतीही तत्परता दाखविण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, ही बाब शिवसेना (शिंदे गट) भुसावळ शहरप्रमुख अवि भगत यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एम.एच. १९ डीके ०११४ असून जखमींमध्ये एका व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही.

अवि भगत यांनी स्वतः पुढाकार घेऊन खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. जखमींना तातडीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर भगत यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला. “पुढे अशीच दुर्लक्षाची भूमिका राहिली, तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी भगत यांच्या तत्परतेचे कौतुक केले असून त्यांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे एका जखमीचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या